विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात काही नव्या योजना आणल्या आहेत, या योजनांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत.
तसेच, या व्हिडिओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचलं आहे.
जयंत पाटील म्हणाले आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले आहे, आम्ही कधी एखादी गोष्टी स्वत: केली असं सांगितलं नाही. त्यामुळे त्यांचा तो स्वभाव आहे त्यामुळे त्यांनी व्हिडिओमध्ये तशी भूमिका घेतली.
मेजॉरीटी आल्यानंतर मुख्यमंत्री होणार, आता महाराष्ट्रातील लोकांचा कल समोर आला आहे. लोकसभेचा कल समोर आला. लोक महाराष्ट्रातील सरकारच्या विरोधातही आहेत. लोक जेवढी एनडीए सरकारविरोधात आहेत त्यापेक्षा जास्त महाराष्ट्र सरकारविरोधात आहेत. त्यामुळे त्यांचे अंतर्गत सर्व्ह ५० , ६० जागांच्या पुढे दाखवत नसतील म्हणून अतिशय टोकाच्या या योजना करण्याचा प्रयत्न केला आहे, असा टोलाही पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला लगावला.