जयसिंगपूर येथे इचलकरंजी आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी बोलताना, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्हीं उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मैदानात उतरत नेत्यांना बळ दिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे हात बळकट करूया, आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवू, या असा निर्धार कार्यकर्त्यांसह रवींद्र माने यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूक महायुती स्वतंत्र लढणार की एकत्र लढणार याबाबत अद्याप भूमिका जाहीर नाही.
अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक इच्छुकांनी आपापली तयारी सुरू ठेवली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची असे डावपेच आखून प्रत्येकाने निवडणुकीच्या तयारीला वेग धरला आहे. महायुतीचा निर्णय जो होईल तो होईल, असे गृहीत धरूनच अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेकांचा निर्णय महायुतीच्या निर्णयावर अवलंबून असल्याने त्यांनी आपले पत्ते खोललेले नाहीत.
अशातच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीबाबत वक्तव्य करून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. शिरोळ तालुक्यातील शिवसेना शिंदेसेनेच्या सर्व पदाधिकांऱ्यांची बैठक जयसिंगपूर येथे झाली. त्यावेळी शिवसैनिकांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवारानी निवडणूक लढवावी, असा निर्धार करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांपैकी हातकणंगलेच्या एका जागेवर धैर्यशील माने यांनी विजय मिळवला. त्यामुळे शिंदे सेनेच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
इचलकरंजीतून रवींद्र माने?
आगामी विधानसभेत जास्तीत जास्त युवकांना संधी मिळावी. त्याची सुरूवात इचलकरंजी शहरातून करूया. इचलकरंजी मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात केली. आजचा मेळावा हा आगामी विधानसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कोणत्या जागा शिंदे गटासाठी पूरक आहेत याचे चाचपणी करण्यासाठी घेतला होता.
इचलकरंजीत महायुतीच्या निर्णयावर अवलंबून असल्याने त्यांनी आपले पत्ते खोललेले…..