इस्लामपूरात अनेक कार्यक्रम अगदी उत्साहाने साजरे केले जातात. मोठ्या संख्येने या कार्यक्रमात अनेक जन आपला सहभाग देखील नोंदवतात. तर इस्लामपूरमध्ये ११ फेब्रुवारीला मराठी सुगम गायन स्पर्धा होणार आहे. माजी मंत्री आम. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीतर्फे राज्यस्तरीय मराठी सुगम गायन स्पर्धा रविवार ता. ११ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष पं. हणमंतराव जाधव यांनी दिली. यावेळी राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष शामराव पाटील उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले, ही स्पर्धा खुला गट व बालगट अशा दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे. सकाळी ९ ते १ या वेळेत बालगट त्यानंतर खुला गट होईल. या स्पर्धा राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी आदर्श बालक मंदिर शाळेजवळ याठिकाणी होतील. स्पर्धेसाठी नाव नोंदणी ता. १० फेब्रुवारी अखेर करणे आवश्यक आहे. यावेळी पं. पंडित लोहार, सौ. संध्या जाधव, सौ. शिवानी जाधव, विनायक वाडेकर, कैलास सावंत, डॉ. मंगेश माळी, सुहास वाघिरे, अमोल सूर्यवंशी, सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.