सुहास भैया बाबर यांच्या प्रयत्नांना यश! विटा बस स्थानकासाठी 15 कोटी मंजूर….

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विकास कामांची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे. विकास कामे व विकास कामांच्या निधीबाबत दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर हे नेहमीच प्रयत्नशील असायचे. त्यांनी प्रत्येक स्तरावर आपल्या मतदारसंघात विकास कामे झाली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी देखील आपला खानापूर मतदारसंघ हा विकास कामात अव्वल ठेवण्याबाबत आग्रही असतात.

त्यांनी आतापर्यंत अनेक शेकडो कोटी रुपयांचा निधी विकास कामांमध्ये उपलब्ध करून आणलेला आहे. विटा बस स्थानक सुसज्ज व्हावे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सुहास बाबर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विटा बस स्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन विटा बस स्थानकासाठी तब्बल 15 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे विटा बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे.

विटा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 15 कोटी रुपये निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. यामध्ये बस स्थानकाच्या प्रशस्त अशा इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच तीन कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल 15 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध झाल्याने सर्व सोयीनियुक्त असे बस स्थानकाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय तर होणारच आहे परंतु विट्याच्या वैभवात देखील भर पडणार आहे अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली आहे.