इचलकरंजी महापालिकेतर्फे ‘आम्ही वृक्षप्रेमी इचलकरंजीकर’ स्पर्धेचे आयोजन

इचलकरंजी येथील महापालिकेच्या वतीने ‘आम्ही वृक्षप्रेमी इचलकरंजीकर’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे. पहिल्या गटामध्ये शहरातील नोंदणीकृत सामाजिक संस्था तर दुसरा खुला गट असणार आहे. शहरातील महिला बचत गट तसेच सार्वजनिक तरुण मंडळांना सहभाग घेता येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. सहभागासाठी २२ जुलै अंतिम मुदत आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अथवा ऑफलाईन प्रवेशिका सादर करता येणार आहेत. स्पर्धेचा कालावधी २९ जुलै ते ७ ऑगस्ट आहे. १३ ऑगस्टला निकाल तर स्वातंत्र्यदिनी बक्षीस वितरण होणार आहे. स्पर्धेच्या अटी व शर्ती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच उद्यान आणि आरोग्य विभागाकडे पाहावयास मिळतील.