अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या युवक सांगली जिल्हाध्यक्षपदी बलवडी (खानापूर) येथील राहुल रमेश केंगार यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अखिल भारतीय होलार समाज
संघटनेचे तत्कालीन युवक अध्यक्ष बापूसाहेब करडे यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्याच्या रिक्त जागेवर राहुल केंगार यांची एकमताने निवड झाली.
या निवडीनंतर बोलताना नूतन युवक जिल्हाध्यक्ष राहुल केंगार यांनी होलार समाजाच्या गेल्या ७० वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून, प्रसंगी न्याय व हक्क मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी संजय ऐवळे, संतोष करडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संतोष करडे यांनी आभार मानले.
