वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गोटखिंडी येथील अंबाबाई देवीचा बारा बलुतेदारांचा भावई उत्सवास आज गुरुवारी सकाळी दिवा या खेळाने प्रारंभ झाला. दिवा खेळात गाढव वाण निघाला. सकाळी ११ वाजल्यापासून पिसे खेळ खेळला गेला. काळे कपडे परिधान करून डोक्यावर, कमरेला, लिंबाच्या झावळ्या, तर हातात लिंबाची फांदी घेऊन गावातून फिरत प्रत्येकाच्या दारासमोर तव्यावर ठेवलेला पाण्याचा तांब्या हातातल्या फांदीने तो उलटला गेला.
गुरुवारी सायंकाळी गावच्या प्रमुख मार्गावरून ‘आर्वच्या, मार्वुच्या सोलापूरच्या, कोल्हापूरच्या सव्वा जोगण्या, सव्वा निघाल्या उदभलंच्या जयघोषात जगण्या उत्सव मोठ्या उत्साहात पार पडल्या. यात युवकांचा सहभाग मोठा होता. यामध्ये जोगा होण्याचा मान संजय गुरव यांना तर जोगणी होण्याचा मान नागनाथ कुंभार यांना मिळाला.
या उत्सवातील प्रमुख खेळ म्हणजे देव व दैत्याचे युद्धाचा खेळ म्हणजे मुखवटे हा शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरु होणार आहे. भावई उत्साहात साजरा करण्यासाठी अमृतेश्वर यात्रा कमिटी बारा बलुतेदारांना घेऊन नियोजन केले असून, परिश्रम घेत आहेत.