आजपासून वाळवा तालुक्यात दृष्टीदिन सप्ताह!

गावोगावी अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. जेणेकरून जनतेला गरजू लोकांना त्याचा लाभ घेता येईल. इस्लामपूर येथील लायन्स क्लब ट्रस्ट आणि लायन्स जयंत नेत्रालयाच्या वतीने आज १० ते १६ जून अखेर विविध गावांतून डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताहानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केल्याची माहिती मार्गदर्शक बाबासाहेब पवार व ट्रस्टचे अध्यक्ष उमेश पवार यांनी दिली.

नवेखेडमधून शिबिर सुरू होऊन प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन यावेळेत नेत्र तपासणी केली जाणार आहे. बोरगाव (११ जून), रेठरेहरणाक्ष (१२ जून), फार्णेवाडी (१३ जून), बहे (१४ जून), हुबालवाडी (१५ जून) आणि खरातवाडीमध्ये १६ जून रोजी दृष्टीदिन सप्ताहाची सांगता होईल.