येत्या 24 जुलैला यंत्रमाग व्याज सवलत योजनेसाठी बैठकीचे आयोजन!

साध्या यंत्रमागधारकांना तसेच शटललेस यंत्रमागधारकांनी घेतलेल्या वर्किंग कॅपिटल व टर्मलोन याच्या व्याज सवलतीसाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या संदर्भात यंत्रमाग धारकांशी चर्चा करून आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या यंत्रमागधारकांसाठी बैठक आयोजित केलेली आहे.

साध्या यंत्रमाग धारकांसाठी पाच टक्के तर शटललेस यंत्रमाग धारकांसाठी दोन टक्के व्याज सवलतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या 24 जुलैला दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन केलेले आहे. ही बैठक पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात होणार आहे. या बैठकीला विटा, सोलापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील यंत्रमाग धारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

निवडणूक आचारसंहितेपूर्वी या सवलत योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्यामुळे राज्यातील लाखो यंत्रमाग धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेत लाभ मिळवण्यासाठी विहित नमुन्यात फॉर्म भरून देण्याचीही व्यवस्था केलेली आहे. बैठकी दिवशीच फॉर्म स्वीकारले जाणार आहेत.