इचलकरंजी येथील मुक्त सैनिक वसाहतीतील काशिलिंग बिरदेव मदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. काशिलिंग बिरदेव मंदिरात रोज तीन वेळा पानपूजा, हारपूजा व आरती होत असते. त्यावेळी भक्त हजर असतात.
नवरात्रौत्सवात असंख्य भक्त व्यंकाप्पा कुंभोजे यांच्याकडून आशिर्वाद व भंडारा घेऊन जात असतात.
गुरूवारी १० रोजी देवाचा जागर आहे. या दिवशी पंचगंगा नदीमधून पुजारी चालत जाऊन पाणी घेऊन येतात आणि देवाला अभिषेक घालून रात्री १२ वाजल्यानंतर पालखी सोहळा (सबीना) सोहळा होतो. दसऱ्या दिवशी हेडाम, शवकळा व सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन पालखी देव माळीला जाते.