सध्या डेंग्यूने थैमान घातलेले आहे बऱ्याच ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण सापडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक दवाखान्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आळते या शहरात देखील डेंग्यूचे रुग्ण सापडल्यामुळे ग्रामपंचायतीने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. आळते येथे सारण गटारींची स्वच्छता सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या तोंडावरती गावात काही प्रमाणात साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने पेठवडगाव येथून अधिकचे कर्मचारी मागून स्वच्छता सुरू केलेली आहे. सध्या दर्गा रोड, शिवाजी चौक परिसरातील गटारीतील कचरा काढण्याचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.