महाविकास आघाडीकडून माजी आमदार उल्हास पाटील आणि सुजीत मिणचेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला आहे.
हातकणंगलेतून अशोकराव माने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामार्फत अर्ज दाखल केला आहे. हातकणंगले मतदारसंघ मूळचा शिवसेना असल्याने येथून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती; मात्र आता डॉ. मिणचेकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणूक आखाड्यात उतरत आहेत, तर शिरोळमधून माजी आमदार उल्हास पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा सुरू आहे.
