आटपाडी पेठेतील पाण्याच्या पाइपलाइनचे काम संथ गतीने…..

आटपाडी नगर पेठेतील रस्त्याचे,पंचायतीच्या पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम संथगतीने होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत आटपाडीचे तहसीलदार तथा नगर पंचायतीचे प्रशासक सागर ढवळे यांनी नागरिकांशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सूचना करत लोकांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले.रस्स्ते प्रश्नी संतप्त नागरिकांनी मागील आठवड्यात नगर पंचायतीवर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले होते.

त्यानंतर प्र. मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी लेखी ग्वाही देत कार्यवाही करण्याबाबत अभिवचन आटपाडीतील रस्तेप्रश्नी तहसीलदार तथा नगर पंचायतीचे प्रशासक सागर ढवळे यांनी नागरिकांशी संवाद साधत आढावा घेतला. या प्रश्नी तहसीलदार सागर ढवळे यांनी सतीश बुर्ले, डॉ. श्रीनाथ पाटील, डी. एम. पाटील, मकरंद चव्हाण, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादासाहेब पाटील, कैलास भिंगे, प्रवीण भिंगे, ठेकेदार मनोज पाटील, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात काम गतीने करण्याच्या सूचना दिल्या.

१५ ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदार व अधिकाऱ्यांनी दिली.नगर पंचायतीकडून तुटलेले नळ कनेक्शन जोडण्यासाठी एक हजार रुपये घेतले जातात ते कमी करण्याची मागणी डॉ. श्रीनाथ पाटील, डी. एम. पाटील यांनी केली. साहित्य आणल्यास मोफत जोडणी केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले. परंतु तसे केल्यास विलंब होणार असल्याने तो निर्णय कायम ठेवला.