केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सुनावणी नेमकी कधी होणार, याची वाट शिवसैनिक आतुरतेने पाहत होते.
अशातच सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख आता ठरली आहे.येत्या १५ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं कळतंय.
त्याचबरोबर आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.या याचिकेवरील सुनावणी देखील १९ जुलैला होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच (Vidhan Sabha Election 2024) खरी शिवसेना नेमकी कुणाची? याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं नेमकं कुणाचं याबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी