कारंदवाडी, कृष्णानगर पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी ७२ लाखाचा निधी मंजूर

आष्टा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर कारंदवाडी गावातील शेतकऱ्यांचे पाणंद रस्त्याचा प्रश्न लागला असून यासाठी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, असे प्रतिपादन उपसरपंच रूपाली सावंत यांनी केले. कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचा प्रश्न भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे विकास हाके, शंकर हाके, भालचंद्र खोत, हेमंत खोत, संदीप सावंत, उपसरपंच रूपाली सावंत, भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य अनिल सरदेशमुख, ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे, ज्येष्ठ नेते सदाभाऊ यादव, दिगंबर ठाणेकर, महादेव हाके, ग्रा. पं. सदस्या सुजाता
खोत, मधुमती कांबळे, अर्चना सरदेशमुख, कारंदवाडीचे माजी ग्रा.पं. सदस्य रमेश हजारे, सयाजीराव सरदेशमुख, काशिनाथ पवार यांनी रस्त्याबाबत वारंवार मागणी केली. या मागणीनुसार निशिकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी उपलब्ध केला आहे.याबद्दल भालचंद्र खोत यांनी संदीप सावंत, उपसरपंच रूपाली सावंत, सचिन लोंढे यांच्यासह इंडोनेशिया येथे सुमारे ८०० हेक्टर ऊस शेतीचा प्रयोग राबवणारे प्रगतशील शेतकरी सुरेश कबाडे, एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी महावीर खिचडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मान केला. यावेळी हेमंत खोत, रवी खिचडे, चंद्रकांत काटकर, अरुण शिंदे प्रीतम खोत, प्रतीक खोत, लक्ष्मण करे उपस्थित होते.