इस्लामपूर शहरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी ….

इस्लामपूर राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील आणि खंडेराव जाधव या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी इस्लामपूर पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वानंतर शहरात आजही जयंतरावांच्या गटाकडे खमके नेतृत्व नाही. तरीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये उतावळ्या इच्छुकांची गर्दी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या यशामुळे इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाचा आलेख वाढला आहे.

आगामी विधानसभेला जयंत पाटील प्रतीक पाटील चिमण डांगे खंडेराव जाधव आगामी पालिका निवडणुकीबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये कसलाही निर्णय नाही. परंतु काही महिन्यांपूर्वी पालिका निवडणुकीत इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले होते, त्यावेळी विविध प्रभागातून १६५ हून अधिक अर्ज आले आहेत. सध्या फक्त विधानसभा निवडणूक हे लक्ष्य असून आमदार जयंत पाटील यांच्या विक्रमी विजयासाठी आम्ही जोरदार तयारी सुरु करत असून यामध्ये मोठे यश मिळवू, शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)मताधिक्य वाढवण्यासाठी त्यांचे पुत्र राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. विधानसभेनंतर येणाऱ्या पालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू होणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यापेक्षा उतावळ्या इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

एकीकडे आगामी विधानसभेला जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्यासाठी महायुतीमध्ये अद्याप एकमत नाही. त्यामुळेच महाडिक गटाने विधानसभा निवडणुकीअगोदरच् पालिका निवडणूक स्वबळावर लढणा असे जाहीर केले आहे. दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमधील इच्छुक कार्यकर्त्यांनाही पालिक निवडणुकीचे वेध लागले आहेत. सध्या इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांच्या अपरोक्ष खमके नेतृत्व नाही. सध्या शहराची हंगामी जबाबदारी अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील आणि खंडेराव जाधव या तिघा नेत्यांनाच देण्यात आली आहे. परंतू शहरात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वेगवेगळे गट असल्याने शहराला खमके नेतृत्व नाही सध्या जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्याकडे प्रभारी नेतृत्व सोपवले असले तरी शहरात संपर्क साधताना या तीन नेत्यांना घेतल्याशिवाय पक्षाचे कार्यक्रम होत नाहीत हे स्पष्ट आहे.