खानापूर सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सुलतानगादे (ता.खानापूर) येथे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे ग्रामपंचायतीने परिसरात जंतुनाशक पावडरची फवारणी केली.गावात डासांचे व माशांचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी
परिसरात आणि ग्रामपंचायतीने घरांच्या सभोवताली व जनावरांच्या गोठ्यामध्ये जंतुनाशक पावडरची फवारणी केली. गावातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव जोरात होत असल्याने ग्रामपंचायतीने केलेल्या औषध फवारणीबाबत ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.