आष्टा येथे बिबट्याचे दर्शन….

आष्टा परिसरातील नायकवडी मळ्यात रात्री एक वाजण्याच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.आष्टा परिसरातील पोखर्णी,नागाव, ढवळी, बहादूरवाडी या परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासुन होती. या परिसरात ऊसशेती झाडी, डोंगर मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याला लपण्यास जागा आहे. परिसरातील शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे शेतकऱ्यांना आढळुन आले होते. यातच रविवारी रात्री नायकवडी सिद्ध मळ्याजवळील राजू कुलकर्णी यांच्या घरासमोरून बिबट्या गेल्याचे येथील सीसीटीव्हीमध्ये चित्रण झाले. यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत
आहे.