विट्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमा वेळी महायुतीत गटबाजी….

विट्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमा वेळी महायुतीत गटबाजी टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विटा दौरा झाला. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे वगळता महायुतीत घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यानी शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच खानापूर मतदारसंघात महायुतीतच गटबाजी असल्याचे दिसून आले.

विटा येथे मंगळवारी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र अमोल व सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भुमीपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते, या मेळाव्याला मोठी गर्दी झाली. परंतु ,महायुतीतील मित्र पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विटा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या या मेळाव्याकडे पाठ फिरवली मात्र, या मेळाव्यात विरोधी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुहास शिंदे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.