शिराळा तालुक्याला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठे रोजगार, व्यवसाय निर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुन्हा ताकदीने उभा करायचा आहे. सर्वसामान्यांच्या विचारांचे, सर्व जाती, धर्माच्या लोकांची प्रगती साधणारे सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वाकुर्डे बुद्रूक योजना झाली. आरोग्य, वीज, शिक्षण, प्रत्येक गावाला स्वतंत्र पिण्याचे पाणी योजना, शेतीचे पाणी, वाडी, वस्तीपर्यंतचे बारमाही पक्के रस्ते झाले. ही प्रगती आपणास कायम ठेवायची आहे. पक्ष फुटीनंतरही कसा सावरता येतो, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व जयंत पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे प्रयत्नातून लोकसभेत राज्याने पाहिले आहे.शिराळा तालुका निसर्गरम्य परिसराने नटला आहे. याची भुरळ पर्यटकांना पडणे सहाजिकच असल्याने रोजगार वाढणार आहेत.नवी मुंबई येथील माथाडी भवनामध्ये शिराळा मतदारसंघातील मुंबईस्थित रहिवाशांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. महापे (तुर्भे, नवी मुंबई) येथे फत्तेसिंगराव नाईक दूध उत्पादक संघ, शिराळाच्या प्रचिती पिशवीबंद दूध निर्मिती प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळ्यामामा म्हात्रे होते. आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख पाहुणे तसेच दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी नगरसेवक चंद्रकांतशेठ पाटील, रणधीर नाईक, विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, प्रचिती दूध ब्रँड आता मुंबईत आला आहे, त्याला प्रतिसाद द्यावा, मानसिंगरावांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात चौफेर प्रगती साधली जात आहे. सर्व संस्था सक्षम आहेत व त्या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती केली आहे.आमदार नाईक म्हणाले, १९९५ विधानसभेपासून शिराळा मतदारसंघात विकासाच्या समाजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.