हातकणंगले येथील ग्रामीण उपाययोजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा.आपत्कालीन वापरासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा २४ तास ३६५ दिवस कार्यरत असते. शासकीय सुटीच्या दिवशीही त्याचे कामकाज सुरू आहे .त्यामुळे या यंत्रणेचा लाभ सर्वच नागरिकांनी संकटकाळी घ्यावा, असे आवाहन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे-पाटील यांनी केले. हातकणंगले पोलिस ठाण्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतच्या बैठकीत ते बोलत होते.गोरडे-पाटील यांनी ग्रामसुरक्षा योजनेचे फायदे, काही महत्त्वाचे क्रमांक, ग्रामसुरक्षा यंत्रणा गावामध्ये सुरू करणेबाबत, सहभागी होणेबाबत व प्रत्यक्ष वापराबाबत माहिती सांगितल .
चोरी, दरोडा , गंभीर अपघात, निधन घटना, आगजळीची घटना, सर्पदंश , हिंसक प्राण्यांचा हल्ला , महिलांची छेडछाड, वाहन व शेतीमालाची चोरी, रेशन धान्य व रॉकेल यांचे गावात होणारे वितरण , ग्रामसभा, ग्रामपंचायतीच्या योजना , सार्वजनिक कार्यक्रमाची माहिती व पोलिस यंत्रणे करून कडून दिल्या जाणाऱ्या महत्वाच्या सूचना ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरासाठी होऊ शकतो. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेचा गैरवापर केल्यास त्याचे दुष्परिणाम याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.