हातकणंगलेतील संजय गांधीचे ९६७ प्रस्ताव मंजूर!

हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीची काल सोमवारी बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ या योजनेतील ९६७ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर २९६ प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून आल्याने ही प्रकरणे संबंधित तलाठी यांच्याकडे पूर्ततेसाठी पाठविली आहेत. ही बैठक तालुकाध्यक्ष झाकीर भालदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

हातकणंगले तालुक्यातील लाभार्थीना फेब्रुवारी व मार्च या महिन्यांचे ४ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. एप्रिल आणि मे महिन्यांचे अनुदान वर्ग करण्याचे काम सुरू आहे.