भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर आता त्याची जागा माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर घेणार आहे. तो संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. गौतम गंभीर हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. त्याच्या प्रशिक्षणाखालीच आयपीएल-2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनली. गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच बनल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडलाय की, टीम इंडियाचा कोच बनल्यानंतर गौतम गंभीरला किती पगार मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूं पैकी एक आहे. 2019 मध्ये गौतम गंभीरने लोकसभा निवडणूक लढवली होती. तो खासदार म्हणून देखील निवडून आला होता. तेव्हा निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत सांगितले होते की त्यांच्याकडे एकूण 147 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दरवर्षी तो 12.5 कोटी रुपये कमावतो. एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीरची सध्याची संपत्ती 250 कोटी रुपये आहे.
गौतम गंभीर हा 2019 ते 2024 पर्यंत लोकसभेचा खासदार होता. आता तो माजी खासदार असल्याने भारत सरकारकडून त्याला वार्षिक 3-3.50 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळते. याशिवाय माजी खासदार म्हणून वेगवेगळे भत्तेही मिळतात. ज्यामध्ये प्रवास, टेलिफोन यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. याशिवाय गौतम गंभीर सामन्यांमध्ये समालोचन करुन देखील कमाई करतो. प्रत्येक सामन्यासाठी त्याला 1.50 कोटी रुपये घेतो. गौतम गंभीर 2018 पर्यंत आयपीएल खेळला. ज्यातून त्याने करोडो रुपये कमावले. IPL-2024 मध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सकडून मेंटर म्हणून करोडो रुपये फी घेतली होती. गौतम गंभीरने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. रेस्टॉरंट आणि रिअल इस्टेट कंपन्यांचाही यात समावेश आहे. यातून गौतम गंभीर दरवर्षी 7-8 कोटी रुपये कमावतो.