दिव्यांग भवनासाठी प्रहार संघटनेचे मंगळवेढा नगरपालिकेसमोर उपोषण

प्रहार संघटना, मंगळवेढा यांनी गेली अनेक वर्ष शहरांमध्ये दिव्यांग भवन व्हावे, यासाठी प्रयत्न करत होते. प्रहार संघटनेच्या प्रयत्नाने नगरपालिकेने त्यांना सि.स.नं. २८७० ही खुली जागा दिव्यांग भवनसाठी असेल असा ठराव करून प्रशासनाने दिला होता. त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती मधून आ. समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दिव्यांगांना भरघोस निधीही दिला. सदर कामाचे मंगळवेढा नगरपालिकेने त्याचे टेंडर काढले, टेंडरची वर्क ऑर्डरही झाली, परंतु ज्या ठेकेदारांनी टेंडर घेतले तो ठेकेदार अद्यापही काम करण्यास तयार नाही, त्यामुळे मंगळवेढा शहरातील दिव्यांग बांधवानी एकत्र येऊन मंगळवेढा नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

एक वर्ष झाले दिव्यांग भवन मंजूर होऊ तरीही अद्यापही भवनाचे काम सुरू होत नसेल तर त्या ठेकेदारावर कारवाई करावी, श्री संत दामाजी मंदिर ते धान्य गोडाऊन पर्यंत भुयारी गटारी झाली, त्या गटारी मधील मुरूम चोरून विकला, त्याच्यावरती कारवाई करावी, अशा मागण्या घेऊन प्रहार संघटने मंगळवेढा नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.

सदरचे उपोषण जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून यावेळी तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, शहराध्यक्ष अनिल गुंगे, तालुका संपर्कप्रमुख शकील खाटीक, शहर उपाध्यक्ष युवराज टेकाळे, महिला शहराध्यक्ष सविता सुरवसे, महिला तालुकाध्यक्ष रुक्मिणी कोकरे , अरुणा घाडगे, वैशाली कोळी, शबाना मकानदार, अबेदा पठाण, सुरय्या शेख, मोनिका बागल, विजया हत्ताळी, शहाजी कांबळे, सोपान सपताळे, असिफ खाटीक, तालुका उपाध्यक्ष सर्जेराव पाराध्ये, विवेक कुंभार, सतीश जावळे, अनिल धोडमिसे, सुलेमान रोगीकर, गणेश मस्के, आप्पा गोरे संभाजी गोसावी, सुहास धुमाळ, पिंटू कोळेकर, दरेप्पा कांबळे, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर निकम, रामचंद्र मेटकरी, महादेव येडसे, सिद्धू मोगले, अतुल जाधव, तानाजी पवार, शिवानंद तटपटे, केशव आसबे, संतोष यादव अर्जुन गायगोपाळ, अंकुश सकट व अनेक मोठ्या प्रमाणात दिव्यांग बंधू व भगिनी उपस्थित होत्या. जोपर्यंत दिव्यांग भवनाचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अशी ठाम भूमिका प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी यांनी घेतली आहे.