अचकदाणी येथील उपोषणकर्ते विजय पाटील यांची तब्येत खालवल्यामुळे सोलापूर येथे उपचार सुरू

महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू असून सांगोला तालुक्यातील अचाकदानी येथे हनुमान मंदीरात उपोषणास बसलेला तरुण विजय ततोबा पाटील याची तब्येत बिघडल्यामुळे तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल येथे दाखल करण्यात आले. अंतरवाली सराटी येथील जरंगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा व धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील अचकदानी येथे शेतकरी कुटुंबातील विजय पाटील यांनी २७ ऑक्टोबर २०२३ पासून गावामध्ये उपोषण चालू केले.

काल रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना १०८ म्बुलन्स मधून सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले आहे. सध्या त्याच्यात त्यांच्यावर उपचार सुरू असून धनगर समाजाला एसटी प्रवर्ग व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचे दाखले मिळत नाहीत तोपर्यंत आपले उपोषण चालू राहणार असे विजय पाटील यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपोषण चालूच आहे.

महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू असून काही ठिकाणी या आंदोलनाने उग्र स्वरूप निर्माण केलेले आहे ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय नेते मंडळी व शासन दरबारी दबाव वाढत आहे परंतु शासनाने अजून पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही तरी सर्व मराठा समाजाकडून राजकीय मंडळींना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे यावर लवकरात लवकर शासन निर्णय अपेक्षित आहे. बेमुदत आमरण उपोषण दिनांक २७/१०/२०२३ रोजी १०:०० वा हनुमान मंदिर, अचकदानी, ता सांगोला येथे श्री विजय तातोबा पाटील रा अचकदानी ता सांगोला है। महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजास आरक्षणाचे दाखले व मराठा समाजास ज आरक्षणाचे दाखले मिळावे या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहेत.

राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी असलेली सांगोला तालुक्यातील एकूण गावे:-

१. मांजरी, २. मेथवडे, ३. गायगव्हाण, ४. खिलारवाडी, ५. मेडशिंगी, ६. एखतपुर, ७. पाचेगाव, ८. हंगरगे, ९. देवकातेवाडी, १०. इटकी, ११. बामणी, १२. डोंगरगाव, १३. वाटंबरे, १४. मानेगाव