सांगली जिल्यातील शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण-इस्लामपूर आणि नॅशनल युनिव्हर्सिटी, फिलिपिन्स यांच्यात महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवले जाईल. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व करिअरच्या संधी मिळतील. प्राध्यापकांना अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक अनुभव मिळेल. सामंजस्य कराराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रा. डॉ. मिलिंद देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक, प्रशासकीय अनुभव, मानसशास्त्रातील संशोधनाच्या योगदानाने करार शक्य झाला.
कराराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील, अध्यक्ष अॅड. एन. आर. पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, संगीता पाटील, डॉ. घनःशाम कांबळे, प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. सामंजस्य त्याअंतर्गत विविध उपक्रम हाती करार ५ वर्षांसाठी राहणार असून घेतले जातील. या संधीचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, सरोज पाटील यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय करार विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर शिक्षण आणि करणार आहे. करार दोन्ही संशोधनाच्या नव्या वाटा खुल्या संस्थांमधील शैक्षणिक व संशोधन सहकार्य अधिक दृढ करेल आणि उच्च शिक्षणाच्या विकासाला नवीन गती देईल.