राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी आणि राजाकरण रंगले आहे. सांगलीमध्ये देखील राजकारण रंगले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विकासापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे अडचण निर्माण झाली.पण, एका पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही.
शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते. ज्यांना आपण सहकार्य केले त्या मंडळींनी अडचणीच्या काळात आपला विश्वासघात केला. आपणास अडचणी निर्माण केल्या. मात्र दोन महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुका आहेत. ही निवडणूक आपणाला जिंकायची आहे, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार संजय पाटील यांनी घेतला आहे. यावेळी स्वर्गीय आर. आर. पाटील कुटुंबाचे नाव न घेता त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप त्यांनी केला.
पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही, विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करून विधानसभा (Tasgaon Vidhan Sabha) जिंकायची असल्याचे सांगत सांगली लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते, असेही संजयकाका म्हणाले. तथापि, संजय पाटील यांनी स्वतः विधानसभा लढवणार की मुलगा प्रभाकर यांना निवडणुकीत उतरवणार? हे मात्र अद्याप जाहीर केलेलं नाही.
संजय पाटील म्हणाले की, सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे माझी अडचण निर्माण झाली, पण या पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही. दोन महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करून आपणाला विधानसभा जिंकायची आहे, असे आवाहन माजी खासदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.