खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे स्व.अनिल बाबर आमदार होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. तसंच बाबर यांना पाणीदार आमदार असंही म्हटलं जात होतं.
स्व.आमदार अनिलभाऊ बाबर हे कायम अनेक वेळा धार्मिक कार्यक्रमात रंगताना प्रत्येकाने पाहिलेलेच आहे. आज देखील आषाढी वारीच्या निमित्ताने आलेल्या दिंडीचे स्वागत करण्यासाठी सुहासभैय्या बाबर आणि त्यांच्या पत्नी सोनियाताई बाबर यांनी पुढाकार घेतलेला आहे.
अनिल भाऊंची कमी ते मतदार संघामध्ये जाणवू देत नाहीत. याच निमित्ताने स्व. आमदार अनिलभाऊ बाबर आणि सुहास भैया बाबर यांचा वारीतला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. स्व.आमदार अनिलभाऊ बाबर हे दिंडी सोहळ्यात सामील झाल्याचा तसेच यावर्षी सुहास भैय्या बाबर यांनी दिंडीचे स्वागत केल्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला दिसत आहे.