इचलकरंजी येथील एसटी महामंडळाच्या इचलकरंजी आगाराच्या वतीने आषाढी वारीनिमित्त पंढरपूर मार्गावर वाहतुकीचे नियोजन केले आहे. १३ जुलै ते १८ जुलै या कालावधीत एकूण १७ जागा एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. सकाळी ७:३० व ९ वाजता थेट पंढरपूर, ८ व २:३० वाजता सोलापूर मार्गावर जादा गाड्या धावतील.
१६ ते १८ जुलै कालावधीत वारकऱ्यांच्या सोयीसाठी गर्दीनुसार गाड्या वाढवण्यात येणार आहेत. आषाढी एकादशीदिवशी २० बसेस धावणार आहेत. तसेच ग्रामीण भाग व विविध भागांतून थेट पंढरपूरसाठी ४० व त्यापेक्षा जास्त भाविक असल्यास सवलतीसह एसटी बसेस ग्रुप बुकिंगद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली.