गेली दोन दिवस सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत काल दिवसभरात साडेतीन फूट वाढ झाली. घाटावरील पहिला टप्पा पाण्याखाली गेला आहे. मात्र, अद्याप नदीपात्राबाहेर पाणी पडलेले नाही. जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तूर्त वाहतुकीला कोणताही अडथळा आलेला नाही.
इचलकरंजीत पंचगंगा पाणी पातळीत वाढ
