संजय कांबळे यांना महाराष्ट्र कोष्टी समाजभूषण पुरस्कार जाहीर, २५ डिसेंबरला प्रदान करण्यात येणार

इचलकरंजी येथील चौंडेश्वरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन, माजी उपनगराध्यक्ष संजय महादेव कांबळे यांना सामाजिक, उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा महाराष्ट्र कोष्टी समाजभूषण पुरस्कार देवांग कोष्टी पुणेच्यावतीने जाहीर करण्यात आला. 

२५ डिसेंबर रोजी श्री गणेश कला क्रिडा मंच, नेहरू स्टेडियम जवळ स्वारगेट पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देवांग कोष्टी समाजाचे पुणे येथील अध्यक्ष मल्हारराव ढोले यांनी केली. सदर संस्थेच्यावतीने देवांग कोष्टी समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारासाठी निवडले जाते. इचलकरंजीतील संजय कांबळे हे गेली अनेक वर्षे समाजाचे काम करत असल्याने त्यांची निवड करण्यात आली. पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.