महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी! १४६९० पदांसाठी होणार भरती…..

महायुती सरकर महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे.आदिती तटकरेंनी अंगणवाडी मदतनीसांच्या भरतीची घोषणा केली असून 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.