आजकाल चोरी, गुन्हेगारीच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळतच आहे. अशातच सांगोल्यात एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. चक्क चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला आहे. सांगोला शहरातील मिरज रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला असून या घटनेमुळे सांगोला शहर व परिसरात सांगोला शहरातील एटीएम मशीनच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
त्याचप्रमाणे कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने पळून नेले असल्याची घटना 15 जुलै रोजी रात्री सांगोला महाविद्यालयाजवळ घडली आहे. चोरीची फिर्याद अरबाज शेख यांनी सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 जुलै रोजी नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण जेवण करून रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास झोपी गेले. फिर्यादी अरबाज शेख हे सांगोला येथे सूत गिरणी येथे दुपारी चार वाजता कामास गेले होते.
रात्री साडेबाराच्या दरम्यान फिर्यादी हे घरी आले होते. त्यानंतर पहाटे 2:45 मिनिटांनी फिर्यादी यांचे वडील काशीम शेख यांनी फिर्यादी यांना फोन करून सांगितलं की दरवाजास बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे तू खाली ये.हे सांगितले ना फिर्यादी अरबाज यांनी खाली येऊन पाहिल्यावर आई वडील झोपलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली होती. ती कडी काढल्यानंतर ते बाहेर आले. त्यानंतर शेजारी असलेल्या खोलीकडे पाहिले असता त्या खोलीस लावलेले कुलूप हे कडीतून कट केलं होतं. त्या खोलीचा दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता घरातील पत्राच्या पेटीचे लहान कुलूप तोडलेले व पेटीतील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं.
पेटीमध्ये ठेवलेले आईचे 21 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे पाऊण तोळा वजनाची बोर माळा व रोख रक्कम 6500 हे चोरून नेले होते. त्याचप्रमाणे मिरज रोड येथे असणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नही झाला आहे. परंतु एटीएम मधून काहीही रक्कम चोरीस गेली नाही. तसेच फिनिक्स डायग्नोस्टिक सेंटर कडलास नाका सांगोला येथील सेंटरचे कुलूप तोडले आहे. परंतु त्यांचेही काही सामान चोरीस गेले नसल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.