हॉटेल श्रीराममुळे सांगोला नगरीच्या वैभवात भर पडली : आम. डॉ. बाबासाहेब देशमुख

उद्योग व्यवसाय छोटा असो की मोठा यापेक्षा त्याच्याशी प्रामाणिकपणा व निष्ठा असणे गरजेचे आहे. हीच निष्ठा ठेवून प्रत्येक उद्योग व्यवसायात यशस्वी पाऊल टाकत, शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल श्रीराम या नावाने सहावं हॉटेल सुरू केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा एकोपा आणि त्यांनी केलेल्या कष्टाचे हे मोल असून, श्रीराम हॉटेल व लॉजिंग मुळे सांगोल्याच्या वैभवात शास्त्रे कुटुंबियांनी भर टाकली आहे असे शुभेच्छापर विचार आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. उद्योग व्यवसाय छोटा असो की मोठा यापेक्षा त्याच्याशी प्रामाणिकपणा व निष्ठा असणे गरजेचे आहे. हीच निष्ठा ठेवून प्रत्येक उद्योग व्यवसायात यशस्वी पाऊल टाकत, शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल श्रीराम या नावाने सहावं हॉटेल सुरू केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा एकोपा आणि त्यांनी केलेल्या कष्टाचे हे मोल असून, श्रीराम हॉटेल व लॉजिंग मुळे सांगोल्याच्या वैभवात शास्त्रे कुटुंबियांनी भर टाकली आहे असे शुभेच्छापर विचार आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोल्यातील हॉटेल क्षेत्राच्या वैभवात भर टाकणारा सुसज्ज असं शुद्ध शाकाहारी श्रीराम प्युअर व्हेज आणि लॉजिंगचा भव्य शुभारंभ संपन्न होत आहे. शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात स्वतःचां ब्रँड तयार केला आहे. अजनाळे डाळींबाचे तसेच वासुद हे गाव हॉटेल मालकांचे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही. मी या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देत असताना, एकत्र कुटुंब असले तर कशा पद्धतीने कुटुंबाचा विकास होतो हे या शास्त्रे कुटुंबाकडून शिकले पाहिजे. मागील अनेक वर्षापासून श्रीराम हॉटेलची चव आणि ग्राहकांची विश्वासहर्ता त्यांनी टिकून ठेवली आहे. यापुढे ही सोलापूर – कोल्हापूर हून निघाले तरी सांगोल्यात नाश्ता व जेवण करून जायचं असा वेगळा करिश्मा ते या हॉटेलच्या माध्यमातून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत यातून निश्चित त्यांची प्रगती घडेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.