राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मागील 2019 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे. अंतर्गत सर्व्हे, त्याचे निष्कर्ष आणि त्यावर दिपकआबा साळुंखे यांच्या गटाकडून जोरदारपणे काम केले जात आहे. त्यामुळे सांगोल्याच्या लढतीकडे सोलापूर जिल्ह्याबरोबरच महायुतीच्या नेत्यांचेही लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शहाजीबापू पाटील यांनी आपण मैदान सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीची अनेक जण अनेक ठिकाणी तयारी करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनता जो कौल देईल, तो सर्वांना स्वीकारावा लागणार आहे.
आगामी विधानसभेची निवडणूक मी सांगोला मतदारसंघातून ताकतीने लढणार आहे, असे आव्हान आमदार शहाजीबापू पाटील यांनी महायुतीमधील सहकारी दीपक साळुंखे यांना दिले.आगामी विधानसभेची निवडणूक मी सांगोला मतदारसंघातून ताकतीने लढणार आहे, असे आव्हान आमदार शहाजीबापू पाटील यांनी महायुतीमधील सहकारी दिपकआबा साळुंखे पाटील यांना दिले.