काल आषाढी एकादशी निमित्त सर्वच मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगाच रांगा आपणाला पाहायला मिळाल्या. दर्शन घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील विठ्ठल मंदिरामध्ये माजी आमदार अमोल महाडिक यांनी काल आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविकांसोबत रांगेत उभे राहून दर्शन घेतले.
त्यांची इतकी मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना देखील त्यांनी अगदी साधेपणाने भाविकांसोबत दर्शन घेणेच पसंत केले. यावेळी त्यांनी दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला व त्यांची विचारपूस देखील केली. यावेळी उपसरपंच कृष्णात करपे, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, महादेव सुतार, संदीप तानवडे यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.