आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघांमध्ये नेतेमंडळींची धामधूम सुरू झालेली आहे. प्रचार, दौरे, सभा यावरती जोर दिला जात आहे. अशातच हातकणंगले विधानसभा काँग्रेस पक्षाचे सहसंपर्क प्रमुख व काँग्रेससह नियंत्रण समिती अध्यक्ष राजकुमार मिठारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व काँग्रेस विधानसभा संपर्कप्रमुख रघुनाथ पिसे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रमोद धनवडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या निर्णयामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांना मोठे बळ प्राप्त होणार आहे. या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीत चैतन्याचे वातावरण तयार झाले तर काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.