बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढाकार घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना सहा महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्यक आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघ रिक्त झाला असून, या पार्श्वभूमीवर होणारी पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवतील, असा निर्णय राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून इतर कोणताही उमेदवार अर्ज दाखल करणार नाही, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनीही स्पष्ट संकेत दिल्याचे समजते.
Related Posts
मोठी बातमी! मनसे महायुतीत सहभागी होणार…..
मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत…
‘…अन् तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं’, केसरकरांनी सांगितला शिवसेना फुटीवेळचा ‘तो’ प्रसंग
जून 2022 मध्ये शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. शिवसेनेत पडलेल्या…
इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला की भाजपला? महायुतीची कसोटी……
लोकसभा निवडणुकीनंतर आता सध्या सगळीकडेच विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहे. आपापल्या परीने अनेक नेते मंडळींची हालचाल सुरू असलेली पाहायला मिळत…
