कट्टर प्रतिस्पर्धाचं विराटच्या निवृत्तीसंदर्भात धक्कादायक विधान’…हे लज्जास्पद…

इंग्लंडमध्ये पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या भारताच्या मालिकेआधीच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र विराटने निवृत्ती घेतल्याचं जाहीर केल्यानंतर इंग्लंडच्या संघातील त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एका खेळाडूने विराट किती महान फलंदाज आहे आणि तो विरोधक म्हणून कसा आहे याबद्दल फारच भावनिक विधान केलं असून सध्या या खेळाडूने केलेलं विधान(statement) व्हायरल होत आहे.

विराटला मेसेज पाठवला
ज्या खेळाडूने विराटबद्दल भावनिक विधान(statement) केलं आहे त्याचं नाव आहे बेन स्ट्रोक्स! विराट कोहलीने अमर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दिलेलं योगदान आणि या दिर्घ प्रकाराच्या क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी केलेल्या सर्व कष्टाची आठवण काढत बेन स्ट्रोक्सने विराटचं कौतुक केलं आहे. मला विराटविरुद्ध खेळायला फार आवडायचं, असंही बेन स्ट्रोक्स म्हणाला. तसेच आपण विराट कोहली निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला मेसेज केल्याचंही बेन स्ट्रोक्स म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यामंध्ये तू खेळणार नाहीस हे फारच निराशाजनक असल्याचं, मी त्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलंय, असं बेन स्ट्रोक्सने सांगितलं.

आम्हा दोघांची मानसिकता सारखीच
“मैदानावरील झुंजार वृत्तीची भारतीय संघाला नक्कीच कमतरता जाणवले. त्याचा स्पर्धात्मक स्वभाव, जिंकण्याची इर्षा कौतुकास्पद होती. त्याने 18 नंबरच्या जर्सीला कायमचं स्वत:चं करुन घेतलं. कदाचित आता कोणत्या ही भारतीय खेळाडूच्या पाठीवर हा क्रमांक दिसणार नाही. तो फार दिर्घकाळ उत्तम क्रिकेट खेळला. आता तुझ्याविरुद्ध खेळता येणार नाही आमच्यासाठी हे लज्जास्पद आहे. मला विराटविरुद्ध खेळायला आवडतं. आम्ही कायमच एकमेकांविरुद्धच्या स्पर्धेचा आनंद घेतला आहे. यामागील कारण म्हणजे मैदानावरील आमची मानसिकता सारखीच असते. आमची मानसिकता युद्धाची असते,” असं बेन स्ट्रोक्सने विराटबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

कव्हर ड्राइव्ह कायमच लक्षात राहील
“विराट फारच भन्नाट खेळाडू आहे. त्याला अनेक विशेषणं देता येतील. यात काहीच शंका नाही की भारताबरोबरच त्याचे इथे (इंग्लंडमध्येही) अनेक चाहते आहेत आणि त्याच्यावर दोन्ही देशांमधून कौतुकाचा वर्षाव होत असतो. त्याने इंग्लंडमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उठून दिसणारी आहे. विराटबद्दल मला कायम एक गोष्ट लक्षात राहील ती म्हणजे तो कव्हरमध्ये ज्या ताकदीने चेंडू टोलवायचा ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. त्याने लगावलेला कव्हर ड्राइव्ह दिर्घकाळ माझ्या लक्षात राहील,” असंही बेन स्ट्रोक्सने म्हटलं.