आ. शहाजीबापूंचा पाठपुराव्यास यश! मतदारसंघातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली होती. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील ४० किमीच्या दहा रस्त्यांसाठी ५६ कोटी ८१ लाख ५७ हजार रुपये तर दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीसाठी २ कोटी ६२ लाख ८१ हजार रुपये असा एकूण ५९ कोटी ४४ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यामुळे सांगोल्यातील रस्त्यांना झळाळी मिळणार आहे. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ संशोधन व विकास अंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील दहा रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील ४० किमीच्या दहा रस्त्यांसाठी ५६ कोटी ८१ लाख ५७ हजार रुपये तर दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीसाठी २ कोटी ६२ लाख ८१ हजार रुपये असा एकूण ५९ कोटी ४४ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लवकरच या कामांना सुरवात होणार असून दहा वर्षे होणार देखभाल दुरुस्ती होणार असल्याने मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.