सांगोला नगरपरिषद सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता राज्य निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहितेच्या अनुषगाने मा.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार असंतोष कणसे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 6 रोजी दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी – दि. 10 ते 17 (दुपारी 2 पर्यंत) आहे. नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी – दि. 10 ते 17 (दुपारी 3 पर्यंत) रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशन पत्राची छाननी व वैदरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक – दि. 18 सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दि. अपील नसेल तेथे – दि. 19 ते 21 दुपारी 3 वाजेपर्यंत, अपील असल्यास वैदरीत्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. दि. 21 ते 25 अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल.
त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दि. 25 पर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दि. 26 आहे. मतदानाचा दिनांक – 2 डिसेंबर सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दि.3 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून मतदार संख्या – 33698 (दि. 1 जुलै रोजीची) सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्त्री मतदार संख्या – 16838, पुरुष मतदार संख्या – 16858, इतर -2, मतदान केंद्र संख्या – 40 असणार आहे.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुधीर गवळी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी निवडणूक विषयक बाबींमार्फत मार्गदर्शन केले.
