लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांना मिळाली. यांच्या पाठीशी मा. आम.जयंत पाटील यांची ताकद असूनही इस्लामपूर मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यासाठी मा. आम.जयंत पाटील यांच्यावर पक्षाच्या राज्यातील उमेदवाराची जबाबदारी असल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचे कारण पुढे केले जाते.
मात्र हे कारण आगामी विधानसभा निवडणुकीत सांगून चालणार नाही त्यामुळे जयंतगड मजबूत ठेवण्यासाठी प्रतीकदादा पाटील हे इस्लामपूर मतदारसंघात तळ ठोकून आहेत. इस्लामपूर मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यात विरोधकांची सत्ता असली तरीही गेल्या सात विधानसभा निवडणुकात जयंत बुरुज ढासळलेला नाही. त्यांच्या विरोधात या मतदारसंघात खमके नेतृत्व नाही. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघाची धुरा मा. प्रतीकदादा पाटील यांच्याकडे सोपवली आहे.
मा. प्रतीकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मतदारसंघातील विविध भागांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रत्येक ठिकाणी स्वतः प्रतीक पाटील यांनी उपस्थित राहून जनसंपर्क वाढविला आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत कमी झालेले मताधिक्य पुन्हा वाढविण्यासाठी राजकीय खेळी सुरू आहे.