सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर खूपच वाढलेला आपणाला पाहायला मिळत आहे. पावसाची संततधार ही सुरू आहे. त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हातकणंगले परिसरात पावसाची संततधार ही गेल्या दोन दिवसांपासून सुरूच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेचा इशारा पातळीकडे प्रवास सुरू देखील झालेला आहे. परंतु अशातच रांगोळीकरांची मात्र धाकधूक वाढलेली आपणाला पाहायला मिळत आहे. जर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर इचलकरंजी रांगोळी या मार्गावर पुराचे पाणी येऊन हा मार्ग बंद होतो. रांगोळीकरांचा मग इचलकरंजीशी संपर्क तुटतो. त्यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रांगोळी जंगमवाडी रेंदाळ या रस्त्याचा वापर केला जातो. परंतु सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे म्हणजेच हा रस्ता अद्याप खुला नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया मिळत आहेत. रांगोळी संगमवाडी रेंदाळ रस्ता खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.