‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली परदेश वारीची संधी!

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावयाचे होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले होते. परंतु जिल्ह्यासाठी केवळ तीन शेतकऱ्यांचे उद्दिष्ट असल्याने पात्र प्रस्तावांपैकी ३ जणांना ही संधी मिळणार आहे. याबाबतची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून जगदीश साताप्पा गोंगाने, निगवे खालसा, ता. करवीर, उत्तम इरगोंडा पाटील, कबनूर, ता. हातकणंगले, सुधीर मोतीराम लांडे, माणगाव ता. चंदगड या तिघांची या प्रक्रियेतून निवड करण्यात आली आहे.