कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ असे व्हावे, यासाठी हातकणंगले भारतीय जनता पार्टीच्यावतीने तहसिलदार सुशिल बल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. छत्रपतीचे किती अखंड देशात असून त्यांना ऐकरी संबोधने अयोग्य असल्याचे या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ व्हावे अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपा शहराअध्यक्ष अमर इंगवले यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी दिनानाथ मोरे, रमजान मुजावर, विजय वसगडे, नंदादेवी चौगुले, संतोष कांबळे, पंकज चौगुले, अभिषेक कोळी, विनायक हजारे, तानाजी चौगुले, संजय नंदीवाले, भावेश पटेल यांच्यासह भाजप कार्यकते उपस्थित होते.
