मा. वैभवदादा पाटील यांची खानापूर आटपाडीत मोठी मागणी!

खानापूर परिसरातील मागील काही दिवसांमध्येच एका लहान बालकाचा सर्पदंशाने त्याला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. ही बाब अतिशय गंभीर असून अशी घटना यापुढे घडू नये कारण खानापूर आटपाडी भागात टेंभू योजनेच्या पाण्यामुळे नवनवीन जातीच्या विषारी सर्वांची संख्या कमालीची वाढल्याने या भागातील लोकांच्यावर खूप मोठी जीवितहानी होत असलेली पाहून सर्पदंश झालेल्या जखमींना वेळेत व योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. तरी या गोष्टीकडे गांभीर्याने आपण लक्ष घालून सर्पदंशाची लस प्रत्यक्ष दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात यावी.

त्याचबरोबर सर्पदंश झाल्यानंतर त्वरित त्या पेशंटला प्रथमोपचार मिळाल्यास निश्चितच आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो त्यामुळे त्यांना प्रथमोपचार लगेचच मिळावेत अशी आग्रही मागणी खानापूर आटपाडीचे युवानेते मा. वैभवदादा पाटील यांनी माननीय जिल्हा वैद्यकीय अधिकारी गायकवाड साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असता त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करून ज्या त्या स्तरावर ती मदत करण्याची घोषणा केली.