सांगोला तालुक्यातील गाव खेड्यात आणि वाड्यावर राहणाऱ्या नागरिकांशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील थेट संवाद साधत आहेत. या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात ग्रामीण भागातील शेकडो गरजू नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी सध्या दिपकआबा प्रयत्नशील आहेत.
त्यांनी आपल्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात अनेक गावातील वाड्यावस्त्यावर जाऊन नागरिकांची व्यथा ऐकली व गावकऱ्यांशी संवाद साधला. वस्तीवाड्यावर राहणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. थेट जनतेत मिसळून सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा हा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुरू आहे.
गावभेट दौऱ्यामध्ये नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अनेक प्रश्नांविषयी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासमोर अडचण मांडली. यावेळी दिपकआबांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष लोकासमोरच दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या रूपाने प्रथमच सांगोला तालुक्यातील केवळ आपल्या कार्यालयातून जनतेशी संवाद न साधता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि त्यांच्या वाड्यावर जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणू घेत आहेत.
दिपकआबांच्या या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यामुळे खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यांवर असणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी दूर होत असल्यामुळे आबांच्या या जनसंवाद आणि गावभेट दौऱ्याची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे.
