राज्यात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनावर सत्ताधारी महायुती आणि महाविकासआघाडीतील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणरा असल्याचे बोललं जात आहे. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची ही भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर ही भेट होणार आहे. आज दुपारी 2 वाजता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच गुंजवणी पाणी प्रश्नासाठी शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली होती. याच मुद्द्यावर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे.