महाराष्ट्रात आमदारकीच्या निवडणुका कधी?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार, हे जवळपास निश्चित आहे.आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) हे महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत. तर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे महाविकास आघाडी म्हणून मैदानात असतील. महाराष्ट्रात विधानसभेत २८८ आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 आमदारांसह पहिल्या क्रमांकावर होता. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.महाराष्ट्रामध्ये पुढील दोन महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

सप्टेंबर अखेरीस निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात नवीन सरकार स्थापन होईल.