वाळव्यातील बहेत ढगफुटी सदृश्य पाऊस…..

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ७७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा (चांदोली) धरण परिसर, वाळवा तालुक्यातील बहे, ताकारी आणि कासेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या ठिकाणी १०० ते १२५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्यात सरासरी २८.२ मिलिमीटर पाऊस झाला असून कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवारी दुपारी २६ फुटापर्यंत पाणीपातळी पोहोचली आहे.

जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरु झाला आहे. शिराळा तालुक्यात चरण, शिराळा, कोकरुड परिसरात अतिवृष्टी झाली आहे. वारणा-चांदोली धरण परिसरात चौवीस तासात १०४.८ मिली मीटर वाळवा तालुक्यातील बहे १२५.८ मि.ली., कासेगाव ९५.३ मि.ली., ताकारी परिसरात १२५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी ढगफुटी सदृश्य असाच पाऊस होता, असे सांगितले. पावसाचा जोर वाढल्यामुळे सोमवारी दुपारी कृष्णा नदीचीसांगली आर्यविन पुल येथे २६ फुटापर्यंत पाणीपातळी गेली होती.